Budget 2019 : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 5 जुलै 2019

- पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार वाढ.

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये विशेष अतिरिक्त जकात कर आणि रस्ते विकासकरामध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयांनी वाढ केली जाणार आहे.  

दरम्यान, पेट्रोल-डिझेलमध्ये झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget 2019 Petrol Diesel Prices will be Increased