Union Budget 2021 : 'मोदी सरकार सुटकेसवालं नाही'; मेड इन इंडिया टॅबवरून आलंय बजेट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

अर्थमंत्री निर्मला सितारमण 2021 चा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

नवी दिल्ली - Union Budget 2021 अर्थमंत्री निर्मला सितारमण 2021 चा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. 

यंदाच्या अर्थसंकल्पात मोठा बदल झाला असून पेपरलेस बजेट सादर केलं जाणार आहे. याआधी अर्थसंकल्पाच्या प्रति छापून त्या खासदारांना दिल्या जात होत्या. मात्र यावेळी थेट अॅपच्या माध्यमातून बजेट सादर केलं जात आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमण संसदेत जात असताना त्यांच्या हातात बहीखाता ऐवजी मेड इन इंडिया टॅब होता. राष्ट्रीय प्रतिक असलेल्या अशोक स्तंभाचा लोगो असलेल्याा लाल कापडात गुंडाळला होता. 

Image may contain: 9 people, people standing, text that says "सकाळ F"

पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मोदी सरकार हे सुटकेसवालं सरकार नाही असं म्हणत विरोधकांवर टीका केली. 

यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा आहे. याआधी अर्थसंकल्पामध्ये कातडी ब्रीफकेसमधून कागदपत्रे घेऊन जात. या परंपरेची सुरुवात देशाचे पहिले अर्थमंत्री आरके शणमुखम चेट्टी यांनी केली होती.

Image may contain: 5 people, text that says "सकाळ"

निर्मला सितारमण यांनी 2019-20 मध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे लाल रंगाच्या पारंपरिक बही खात्यातून आणली होती. त्यानंतर यंदा पेपरलेस बजेट सादर केलं जाणार असून त्यासाठी अॅप लाँच करण्यात आलं आहे. 

Image may contain: 7 people, people standing, text that says "सकाळ"

अर्थमंत्र्यांनी हलवा समारंभावेळीच युनियन बजेट मोबाईल ॲप या ॲपचेही उद्घाटन केले. यात अर्थसंकल्प (आर्थिक ताळेबंद), अनुदान विषयक मागण्या, वित्त विधेयक आणि इतर दस्तावेज बघता येतील. अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केल्यानंतर सर्व कागदपत्रे उपलब्ध होतील.

Image may contain: 7 people, people standing, text that says "सकाळ"

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget 2021 updates paperless union budget app nirmala sitharaman made in india tab