
Union Budget 2023: गुडन्यूज, आयकरात मोठा बदल होण्याची शक्यता
अवघ्या काही तासातच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशातच एक बजेटमधून एक गुडन्यूज मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयकरात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Union Budget 2023 Nirmala Sitharaman Income Tax Economy)
शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि महिला, उद्योजकांपासून ते स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांपर्यंत या अर्थसंकल्पात काय असणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, सीतारामन टॅक्सचं लिमिट वाढवणार की सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा मोदी सरकार टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टॅक्स स्लॅबमध्ये सूट मिळून जवळपास ८ वर्षे झाली आहेत. 2014 मध्ये मोदी सरकारने टॅक्सची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 2.5 लाख रुपये केली होती. त्यावेळी अरुण जेटली अर्थमंत्री होते. तर ६० वर्षांवरील आणि ८० वर्षांखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी करसवलतीची मर्यादा अडीच लाखांवरून तीन लाख रुपये करण्यात आली होती.
तसेच, सरकार अडीच लाखावरून तीन लाख आयकरात सूट देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3 लाखांवरुन ही मर्यादा वाढवून 3.5 लाख रुपये वाढवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.