12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी

वृत्तसंस्था
शनिवार, 21 एप्रिल 2018

कठुआ आणि सुरत येथील बलात्कार प्रकरणे समोर आल्यानंतर इंदूर येथे अवघ्या 4 महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली. 

नवी दिल्ली : सातत्याने होणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्काराचे प्रमाण जास्त असल्याने केंद्र सरकारकडून 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्याबाबत वटहुकूम काढण्यात आला. त्यावर आज (शनिवार) शिक्कामोर्तब करण्यात आले.

Rapist hang

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्याहून परतल्यानंतर आज तातडीने केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेत 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याबाबत वटहुकूम काढण्यावर शिक्कामोर्तब केले. तसेच पोक्सो कायद्यात सुधारणा करून 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केली जाणार आहे. कठुआ आणि सुरत येथील बलात्कार प्रकरणे समोर आल्यानंतर इंदूर येथे अवघ्या 4 महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली. 

दरम्यान, 'भारत की बात सबके साथ' या लंडनच्या सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमात जागतिक व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींनी अशा घटनांवर चिंता व्यक्त केली होती. अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी बजावले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी भारतात परतल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पॉक्सो कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे.

Web Title: Union Cabinet clears ordinance for death penalty to child rapists