केरळमधील मदतकेंद्रातील 'त्या' फोटोमुळे केंद्रीय मंत्री ट्रोल

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जीन्स-टिशर्ट घालून खाली चटईवर झोपलेला हा अल्फॉन्स यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर #Kannanthanamsleepchallenge हा हॅशटॅग व्हायरल झाला व अनेकांनी आपले झोपलेले फोटो विचित्र कॅप्शन देत सोशल मीडियावर पोस्ट केले व अल्फॉन्स यांची खिल्ली उडवली.

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फॉन्स कन्ननथनम यांनी मंगळवारी (ता. 21) केरळातील चंगनचेरी येथील पूरग्रस्तांच्या मदतकेंद्रात रात्र काढली व तेथे झोपलेला फोटो ट्विट केला. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, अनेक लोक उद्याचा विचार करून झोपू शकत नाहीत. या ट्विटवरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. 

जीन्स-टिशर्ट घालून खाली चटईवर झोपलेला हा अल्फॉन्स यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर #Kannanthanamsleepchallenge हा हॅशटॅग व्हायरल झाला व अनेकांनी आपले झोपलेले फोटो विचित्र कॅप्शन देत सोशल मीडियावर पोस्ट केले व अल्फॉन्स यांची खिल्ली उडवली.

या ट्विटमध्ये अल्फॉन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांना टॅग केले आहे. 

Web Title: union minister Alphons Kannanthanam because of tweet