राज्यसभेतील उपनेतेपदाची जबाबदारी 'या' नेत्यावर

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची आज नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झालेले गोयल हे रविशंकर प्रसाद यांची जागा घेतील. राज्यसभेचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री प्रसाद हे नुकतेच लोकसभेवर निवडून गेले आहेत. 

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची आज नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झालेले गोयल हे रविशंकर प्रसाद यांची जागा घेतील. राज्यसभेचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री प्रसाद हे नुकतेच लोकसभेवर निवडून गेले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गोयल यांच्याकडे रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आहे. राज्यसभेतील सभागृह नेतेपदी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांची निवड करण्यात आली आहे. 

गोयल हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले असून, त्यांनी भाजपचे राष्ट्रीय खजिनदार म्हणूनही काम पाहिले आहे. बिहारमधील भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांच्याकडे मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पूर्वी अनुराग ठाकूर यांच्याकडे ही जबाबदारी होती. ठाकूर यांची मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

Web Title: Union minister Piyush Goyal appointed deputy leader of house in Rajya Sabha