गांधी परिवाराचा टू-जी, कोळसा गैरव्यवहारात समावेश : रविशंकर प्रसाद

वृत्तसंस्था
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

''काँग्रेस भ्रष्टाचाराची जन्मजाती आहे. गांधी परिवाराचा टू-जी, कोळसा गैरव्यवराहात समावेश आहे''.

- रविशंकर प्रसाद, केंद्रीयमंत्री

नवी दिल्ली : राफेल गैरव्यवहारावरून काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ''काँग्रेस भ्रष्टाचाराची जन्मजाती आहे. गांधी परिवाराचा टू-जी, कोळसा गैरव्यवराहात समावेश आहे'', असा घणाघाती आरोप रविशंकर प्रसाद यांनी आज (शनिवार) केला.

- रविशंकर यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :

- राहुल गांधी राफेल गैरव्यवहारावर वेगवेगळी किंमत सांगत आहेत.

- राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत.

- अंबानींना करारात सामील करून घेण्याची फ्रान्स सरकारचीच इच्छा होती.

- गांधी परिवाराचा टू-जी, कोळसा गैरव्यवहारात समावेश आहे.

- काँग्रेसच्या कार्यकाळातच रिलायन्ससोबत चर्चा झाली.

- राफेल गैरव्यवहार हा काँग्रेसच्या कार्यकाळातील गैरव्यवहार आहे.

- काँग्रेसच भ्रष्टाचाराची जन्मजाती.

Web Title: Union Minister Ravishankar Prasad Criticizes Congress and Gandhi Family