माझे पुर्वज माकड नाहीत; केंद्रीय मंत्र्यांचा पुनरुच्चार!

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी पुन्हा एकदा डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत नाकारला आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम सोहळ्यात सिंह बोलत होते. ते म्हणाले की, मी याबाबत यापूर्वी जे विधान केले होते ते काही विनोद म्हणून केले नव्हते, तर ते पूर्ण विचारपूर्वक केले होते. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो. तसेच, मी रसायन शास्त्रात पीएचडी केली आहे. मला विज्ञानाची समज आहे.

मुंबई- केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी पुन्हा एकदा डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत नाकारला आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम सोहळ्यात सिंह बोलत होते. ते म्हणाले की, मी याबाबत यापूर्वी जे विधान केले होते ते काही विनोद म्हणून केले नव्हते, तर ते पूर्ण विचारपूर्वक केले होते. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो. तसेच, मी रसायन शास्त्रात पीएचडी केली आहे. मला विज्ञानाची समज आहे.

जे लोक माझ्या या विधानाला विरोध करत आहेत ते करतच राहणार पण एक वेळ अशी येईल की, माझ्या बोलण्याला लोक गांभिर्याने घेतील आणि आज नाही तर उद्या माझं बोलणं त्यांना पटेल, असे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसापूर्वीही डार्विनच्या सिद्धांतावर सत्यपाल सिंह यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर, त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका झाली होती. तरीही, त्यांनी परत एकवेळेस डार्विनच्या सिद्धांत खोटा असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर, डार्विनचा विज्ञानातील हा सिद्धांत खोटा आणि अत्यंत चुकीचा आहे. माणसाची उत्क्रांती वानरांपासून झाली नाही, हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी विदेशात 35 वर्षांपूर्वीच सिद्ध केल्याचा दावाही डॉ. सिंह यांनी केला होता.
 

Web Title: Union Minister Satyapal Singh rejects Darwin theory again