गोव्यात 'एनआयईएलआयटी' केंद्र सुरू करण्याची केंद्रीयमंत्र्यांची घोषणा 

Union ministers announcement of setting up of NIELIT center in Goa
Union ministers announcement of setting up of NIELIT center in Goa

पणजी - गोवा माहिती तंत्रज्ञान (आयटी) धोरण व योजना केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते आज जाहीर करण्यात आली. गोव्यात राष्ट्रीय इलेक्‍स्ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान संस्था (एनआयईएलआयटी) सुरू करण्याची घोषणा करून त्यासाठी जागा उपलब्ध करण्याचे आवाहन त्यांनी केले. देशात वेगाने होत असलेला बदल व आयटी क्षेत्रातील प्रगती पाहिल्यास येत्या काही वर्षात भारत हा जगातील सर्वाधिक स्टार्टअप देश ठरेल असे मत केंद्रीयमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. 

पणजीतील आयनॉक्‍समध्ये माहिती तंत्रज्ञान खात्याने आयटी दिनानिमित्त दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी केंद्रीयमंत्री रवी शंकर प्रसाद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, मंत्री जयेश साळगावकर, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ मोहनदास पै आयटी सचिव अमेय अभ्यंकर, नासकॉमचे संस्थापक तसेच मास्टेकचे चेअरमन अशांक देसाई, इंटेल इंडियाच्या प्रमुख निवृती राय, हे उपस्थित होते. यावेळी केंद्रीयमंत्र्यांच्या हस्ते गोव्यातील सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्क्‍स ऑफ इंडिया (एसटीपीआय) केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. 

आयटी क्षेत्र विलक्षण असून त्याला मदतीची गरज आहे व त्यासाठी गोवा हे योग्य राज्य आहे. देशात दिवसेंदिवस 'एसटीपीआय' स्टार्टअपची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी निवडणूक प्रचारात डिजीटल इंडियाचा नारा दिला होता तो आता प्रत्यक्षात यशस्वी होत आहे. देशात मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे. मात्र त्याला पाठबळ देणाऱ्या साधनसुविधा उपलब्ध नसल्याने आयटी विकसीत होऊ शकले नव्हते. देश काही वर्षापूर्वी जगातील औद्योगिक क्रांतीला मुकला मात्र आता या आयटी क्षेत्रात मागे न राहता डिजीटल क्षेत्रात भारताला सर्वोत्तम व्हायचे आहे. "डिजीटल इंडिया'मुळे देशातील कानकोपऱ्यातून त्याचा विविध सेवांसाठी वापर होत होऊन पारदर्शकता आली आहे. डिजीटल हे सुप्रशासन व त्वरित सेवा देणारे माध्यम आहे त्यामुळे देशाची प्रगती झपाट्याने होऊ लागली आहे. अनेक परदेशातील कंपन्या भारताबरोबर आयटी क्षेत्राशी निगडित विविध उत्पादनामध्ये गुंतवणूक करत आहेत. 'सॅमसंग' या कंपनीने देशात मोबाईल बनविण्याचा कारखाना नोयडा येथे सुरू केला आहे. 

भारत देशातील व्यवहार डिजीटायझेशन स्वरुपात होत आहेत. आयटी क्षेत्रात नवनवे उद्योजक तयार होत असल्याने "डिजीटल इकोसिस्टीम'द्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मत केंद्रीयमंत्री प्रसाद यांनी व्यक्त केले. 

भारत देश डिजीटायझेशन करण्याची पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दृष्टी होती. गोव्यात आयटी धोरण व योजना जाहीर करून ती पूर्णत्वास आली आहे. गोव्यात सुमारे 270 उद्योजक असून 3 हजार आयटी व्यावसायिक आहेत. 2003 साली मुख्यमंत्री असताना गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप दिले होते त्यामागील हेतू "आयटी'मध्ये त्यांना रूची निर्माण व्हावा हा होता. गोवा सरकारने धनादेशाचा व्यवहार बंद करण्यास सुरुवात केली असून येत्या डिसेंबरपर्यंत सरकारी व्यवहार पूर्ण डिजीटायझेशन होईल असे सूतोवाच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. 

गोव्यातील आयटी धोरण व योजना घोषित झाल्यानंतर या कार्यक्रमावेळी आयटी क्षेत्रातील "वोसॉफ्ट' या दोन कंपन्यांनी गोव्यात केंद्र सुरू करण्यासंबंधीचा गोवा सरकारशी करार केला. गोवा सरकारतर्फे आयटी सचिव श्रीनेथ कोठवले तर वोसॉफ्ट कंपनीतर्फे विपुल प्रकाश यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. वोसॉफ्ट कंपनी पुढील दीड महिन्यात हे केंद्र सुरू करून सुमारे तीन हजारांना रोजगार उपलब्ध करणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com