पश्‍चिम बंगालमध्ये प्रथमच तेल साठ्यातून उत्पादन सुरु 

पश्‍चिम बंगालमध्ये प्रथमच तेल साठ्यातून उत्पादन सुरु 

अशोकनगर (पश्‍चिम बंगाल) - केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज पश्‍चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन क्षेत्राचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे देशाच्या तेल उत्पादन नकाशात प्रथमच राज्याचे नाव आले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोलकत्यापासून ४७ किलोमीटर अंतरावर असलेल्या अशोकनगर तेल आणि वायू साठ्यातून उत्पादन सुरु झाले असून त्यातून काढलेले तेल हल्दिया येथील तेल शुद्धीकरण कारखान्यात पाठविले जात आहे, अशी माहिती प्रधान यांनी यावेळी दिली. ‘‘महानदी-बंगाल-अंदमान खोऱ्यात असलेल्या अशोकनगरमध्ये २०१८ मध्ये तेलसाठा असल्याचे आढळले होते. येथून तेल उत्पादन करणे व्यावसायिकदृष्ट्या फायद्याचे ठरणार असल्याचे लक्षात आल्यानंतर कामाला सुरुवात झाली. येथील कच्च्या तेलाचा दर्जा उच्च आहे. या तेलक्षेत्रामुळे राज्याच्या उत्पन्नात वाढ होणार असून नोकरीच्या अनेक संधीही उपलब्ध होणार आहेत,’’ असे प्रधान यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

येथील तेल साठ्यांच्या शोधासाठी ‘ओएनजीसी’ने ३३८१ कोटी रुपये खर्च केले असून आणखी दोन तेल विहिरींचा शोध ते घेणार आहेत, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. तसेच, हे क्षेत्र देशातील आठवे हायड्रोकार्बन उत्पादन करणारे खोरे असून सरकारच्या महसूल वाढविण्यासाठीच्या धोरणाअंतर्गत त्यातून उत्पादन घेतले जात आहे. या धोरणानुसार, किचकट सरकारी मंजुरीची प्रक्रिया टाळून कंपन्या तेल क्षेत्रातून उत्पादन घेऊ शकतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com