esakal | Video: चालकाने मोटार पार्क कशी केली असेल बरं?

बोलून बातमी शोधा

unique car parking video viral on social media}

एका युवक कमी जागेत पार्क केलेली मोटार कौशल्याने बाहेर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण, त्याने कमी जागेत मोटार कशी बरं पार्क केली असेल? असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे.

Video: चालकाने मोटार पार्क कशी केली असेल बरं?
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एका युवक कमी जागेत पार्क केलेली मोटार कौशल्याने बाहेर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण, त्याने कमी जागेत मोटार कशी बरं पार्क केली असेल? असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे.

हत्तीचा श्वास रोखून धरणारा व्हिडिओ व्हायरल...

मोटार पार्किंग प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पण, मोटार आकाराने लांब असेल तर पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. अनेकदा पार्किंगसाठी जागा मिळत नाही. सार्वजनिक ठिकाणी पार्क केली तर कारवाई होण्याची भिती. पार्किंगच्या जागेवरून अनेकदा भांडणेही होताना दिसतात. पण, एक युवकाने कमी जागेत मोटार पार्क करून ती पुन्हा रस्त्यावर आणली आहे. पार्क केलेल्या मोटारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये युवकाने कमी जागेत केलेली मोटार कौशल्याने बाहेर काढली. लाखो नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पण, पुढचा प्रश्न आहे की, त्याने ही मोटार कमी जागेत पार्क कशी केली असेल. व्हिडिओ पाहून अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. मोटार पार्किंग करतानाचे अथवा चालवण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या कमी जागेत पार्क केलेल्या मोटारीची चर्चा सुरू आहे.