मुलाला हवीय सुंदर, प्रेमळ अन् प्रखर देशभक्त बायको... आहे का कुठे?

वृत्तसंस्था
Wednesday, 19 February 2020

सध्या अशीच एक जाहिरात व्हायरल होतीय. ज्यात नवऱ्या मुलाच्या अपेक्षा वाचून सगळेजण अवाक् झाले आहेत.

नवी दिल्ली : सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. लग्न जमविण्यापासून ते लग्नसोहळा पार पडेपर्यंत दोन्ही कुटूंबांची तितकीच लगबग सुरू असते. मग ते लग्न जमविण्यासाठी वृत्तपत्रात दिलेली जाहीरात असो किंवा वधू-वरसूचक मंडळात नोंदवलेलं नाव असो... सध्या अशीच एक जाहिरात व्हायरल होतीय. ज्यात नवऱ्या मुलाच्या अपेक्षा वाचून सगळेजण अवाक् झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. अभिनव कुमार या ३१ वर्षीय तरुणाची ही जाहिरात आहे. त्याने इतक्या भन्नाट अपेक्षा लिहिल्या आहेत की, डेंटिस्ट असलेल्या अभिनवची ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनव सध्या काहीही काम करत नाही. पण होणाऱ्या बायकोकडून त्यांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. त्यांना सुंदर, गोरी, प्रामाणिक, विश्वासू, प्रेमण, काळजी करणारी, शूर बायको हवी आहे. 

No photo description available.

अभिनवच्या अपेक्षा एवढ्यावरच थांबत नाहीत, तर विशेष म्हणजे या जाहिरातीत त्यांनी लिहिले आहे की, आपली होणार बायको ही, 'प्रखर देशभक्त' असायला हवी आणि तिने देशाच्या लष्कर आणि क्रीडा क्षेत्रात योगदान दिले पाहिजे. अशा प्रकारची हटके अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. या अपेक्षेमुळे ही जाहिरात जास्त व्हायरल झाली आहे. यासोबतच शेवटी त्याने लिहिले आहे की, होणाऱ्या बायकोला मुलांचे उत्तम संगोपन करता येणे आवश्यक आहे. तसेच मुलीला उत्तम स्वयंपाक करता यायला हवा व मुलगी नोकरी करणारी हवी असेही त्याने लिहिले आहे.

खुशखबर! मोदी सरकारचं गिफ्ट; उचललं महत्त्वाचं पाऊल

अभिनवला ब्राह्मण व वरील सर्व गुण असलेली मुलगी हवी आहे. तो बिहारमधील असून त्याला बिहार किंवा झारखंडमधलीच मुलगी हवी आहे, असेही त्याने या जाहिरातीत म्हणले आहे. ही जाहिरात कोणत्या वृत्तपत्रात आली आहे हे अजून समजले नसून, त्यांच्या भन्नाट अपेक्षेमुळे ती व्हायरल होत आहे.         


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unique expectations of eligible bachelor in Bihar