युनिटेकचे 'एमडी' संजय चंद्रा यांना अटक 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

नवी दिल्ली - युनिटेक कंपनीच्या घरबांधणी प्रकल्पात खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले युनिटेकचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) संजय चंद्रा आणि त्यांचे भाऊ अजय चंद्रा यांना दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज (शनिवारी) अटक केली.

युनिटेक कंपनीच्या ग्रेटर नोएडा येथील एका प्रकल्पात ग्राहकांनी 2006 मध्ये घरासाठी पैसे भरल्यानंतर त्यांना 2008 पर्यंत घराचा ताबा मिळणे अपेक्षित होते. परंतु कंपनीला नियोजित वेळेत ग्राहकांना घरे देण्यात अपयश आले. याप्रकरणी वेळेत घराचा ताबा न दिल्याबद्दल तसेच पैसे परत न केल्यामुळे युनिटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा यांच्यासह कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप झाला होता.

या दोघांना आज दुपारी दिल्ली सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Unitech MD arrested by Delhi police