अनंत तिची ध्येयासक्ती...

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

पुणे- अपंगत्वाने शारीरिक मर्यादा आणल्या. पण, ती रडली नाही. या मर्यादेला ताकद बनवत ती निर्भीडपणे उभी राहिली. याच ताकदीच्या जोरावर तिने वयाच्या 23 व्या वर्षी जागतिक शिक्षण राजदूत बनण्याचा बहुमान मिळवला आहे. दीक्षा धिंडे असे तिचे नाव. दीक्षा ही "युनायटेड नेशन्स‘च्या 

"वर्ल्ड ऍट स्कूल‘ या उपक्रमाची भारतीय शिक्षण राजदूत बनली असून, भारतातील शिक्षण चळवळीचे प्रतिनिधित्व ती आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहे. "रोशनी‘ या संस्थेची प्रतिनिधी असलेल्या दीक्षाने केलेल्या 4 वर्षांच्या सामाजिक कार्याच्या यशस्वितेची ही पावती आहे. 

"शारीरिक मर्यादा आली तरी मनात काम करण्याची जिद्द आणि आत्मविश्‍वास असेल तर यश मिळते हा विचार घेऊनच मी काम करत आहे. भारतीय शिक्षणपद्धतीत बदल करण्यासाठी काम करण्याचा आनंद असून, एक मुलगी खूप काही करू शकते हे मी जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे लोकांनी अपंगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.‘‘ 

- दीक्षा धिंडे, भारतीय शिक्षण राजदूत 

जन्मतःच अपंग असलेल्या दीक्षाची जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मार्चमध्ये शिक्षण राजदूत म्हणून निवड केली आहे. तिने यासाठी सप्टेंबर 2015 मध्ये अर्ज केला होता. "रोशनी‘ या संस्थेची सहसचिव असलेल्या दीक्षाने वस्तीपातळीवर केलेल्या शिक्षणाच्या कामाची दखल घेत तिची निवड करण्यात आली. यामुळे दीक्षा ही आता भारतीय शिक्षणपद्धती, तिचे स्वरूप, बदलते प्रवाह आणि शिक्षण पद्धतीत काय बदल व्हावा, यासाठी काम करणार आहे. त्याबरोबर शिक्षणपद्धतीतील बदलांच्या संदर्भात ती केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाला सूचना देऊ शकणार आहे. तसेच, तिला अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे होणाऱ्या शिक्षण परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. 

दीक्षाला शालेय शिक्षण घेण्यात खूप अडचणी आल्या. अपंग असल्यामुळे तिला खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे नाइलाजाने तिला महापालिकेच्या शाळेत शिकावे लागले. अशा वागणुकीमुळेच तिने पुढे शिक्षणासाठीच काम करावे हा निर्धार केला. वाणिज्य शाखेची पदवी मिळविल्यानंतर ती सध्या इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. 

दीक्षा म्हणाली, ""मला सामाजिक कामासाठी कुटुंबीयांनी मोठे पाठबळ दिले. मी "रोशनी‘ संस्थेत दृष्टिहीन, अपंग आणि वस्तीतील मुलांसाठी काम करत होते. माझे हे काम पाहून माझी शिक्षण राजदूत म्हणून निवड झाली. या उपक्रमांतर्गत मी प्रात्यक्षिके आणि तंत्रज्ञान आणि खुली शिक्षणपद्धती यावर काम करणार आहे.‘‘ 

Web Title: united nations