लव्ह मॅरेजला वैतागून त्याने कापला रेल्वे रुळ!

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 जानेवारी 2020

माझ्या या दोन्ही मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, तर मी अजून काहीतरी भयानक करू शकतो.

लव्ह मॅरेज विषयीच्या अनेक बातम्या अधूनमधून माध्यमांतून प्रसिद्ध होत असतात. घरात पती-पत्नींचे एकमेकांशी कडाक्याचं भांडण झाल्यानंतर ते प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये जातं, त्यानंतर त्याची बातमी सगळीकडे पसरते. आता असंच एक प्रकरण पोलीस स्टेशनच नाही, तर थेट रेल्वे स्टेशनपर्यंत गेलं आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याचं झालं असं की, उत्तर प्रदेशमधील मऊ या गावी एक अजबगजब प्रकार घडला आहे. एका माथेफिरू तरुणाने प्रेम विवाहाला कंटाळून चक्क रेल्वेचा रुळच कापला. रतनपुरा रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या या तरुणाचा प्रकार बघून रेल्वे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मात्र, वेळीच ही गोष्ट लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. 

Image may contain: shoes

- पुणे : कार्ड क्लोन करून 'तो' करायचा बरंच काही...

रतनपुरा रेल्वे स्टेशन हे हलधरपूर रेल्वे विभागांतर्गत येते. बायकोसोबत भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने जवळजवळ दोन इंच एवढा रेल्वेरुळ कापून काढला होता. या कापलेल्या रुळाशेजारी ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये आपण लव्ह मॅरेजला कंटाळून हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. ''बायको माझा छळ करत आहे. त्यामुळे मला 50 कोटी रुपये द्या आणि माझ्या बायकोला घेऊन जा. आणि माझ्या या दोन्ही मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, तर मी अजून काहीतरी भयानक करू शकतो,'' असे म्हटले आहे. 

- #HopeOfLife : कर्करोगाच्या तीन हजार रुग्णांसाठी एकच डॉक्टर! धक्कादायक वास्तव

पोलिस अधिक्षक अनुराग आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका माथेफिरू तरूणाने सुमारे 2 इंच एवढा रेल्वे रुळ कापला. लव्ह मॅरेजला कंटाळलेल्या या तरुणाने बायकोला माहेरी पाठवावे आणि जर माझी ही मागणी मान्य केली नाही, तर मी अजून मोठं नुकसान करणार असल्याची धमकीही दिली आहे. या प्रकरणी पुढील चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.  

Image may contain: 5 people, people standing

- सावंतवाडीतील 'त्या' आत्महत्येमागचे वाढले गूढ

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे स्टेशन परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. स्टेशन मास्तरला माहिती मिळाल्यानंतर या मार्गावरून जाणारी बलिया-शाहगंज पॅसेंजर ही रेल्वे थांबवण्यात आली. काही वेळात रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मिळालेलं पत्र पोलिसांनी ताब्यात घेत रेल्वे संपत्तीचं नुकसान केल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unknown person cut railway track in Uttar Pradesh Mau city due to love marriage issue