मेहुणीच्या प्रेमात पडला अन् मरायला आला सीमेवर...

पीटीआय
गुरुवार, 31 मे 2018

(पंजाब) : प्रेयसीसोबत विवाह न झाल्यामुळे निराश झालेला पाकिस्तानी प्रियकर मृत्यू पत्करण्यासाठी थेट भारताच्या सीमेवर आला. भारताच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान गोळी झाडून आपला जीव घेतील, अशा त्याची अपेक्षा होती, मात्र ती खरी ठरली नाही. मोहम्मद असिफ (वय 32) असे प्रियकराचे नाव आहे.

बीएसएफच्या 118 बटालियनने आसिफला सोमवारी (ता. 28) मॅबोके बॉर्डर पोस्टजवळ पकडले असून त्याला मामडोट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, अशी माहिती बीएसएफच्या अधिकाऱयांनी आज (गुरुवार) दिली. बीएसएफच्या जवानांनी झाडलेली गोळी आपल्या हृदयातून आरपार जाईल व आपल्याला मृत्यू येईल, असे आपल्याला वाटत असल्याचे आसिफने चौकशीदरम्यान सांगितले.

आसिफ हा पाकिस्तानातील कसुर जिल्ह्यातील जल्लोके गावचा रहिवासी. मोठा भाऊ अतिक-उर-रहमान याच्या मेहुणीच्या प्रेमात आसिफ पडला. दोघेही एकमेकावर प्रेम करत होते. दोघांना विवाह करायचा होता. मात्र, दोघांच्याही कुटुंबीयांनी विवाहाची परवानगी नाकारली. आसिफच्या प्रेयसीचे तिच्या मनाविरुद्ध विवाह लावून देण्यात आला. काही दिवसांतच तिचा घटस्फोट झाला. त्यामुळे आसिफने पुन्हा तिच्या कुटुंबीयांकडे विवाहाची मागणी घातली. पुन्हा तिच्या कुटुंबियांनी त्याची मागणी फेटाळली. यामुळे त्याला नैराश्य आले होते.

प्रेमभंग झाल्याची भावना निर्माण झाल्यानंतर गळफास घेऊन आयुष्य संपवावे, अशी योजना होती. परंतु, रमझानच्या पवित्र महिन्यात आपल्याला तो हक्क नसल्यामुळे विचार बदलला. भारतीय सीमेवर आल्यानंतर बीएसएफचे जवान आपल्या दिशेने गोळ्या मारतील आणि यामध्ये आपल्याला मृत्यू येईल, असे वाटत होते, असे आसिफने पोलिसांना सांगितले.

आसिफवर इंडियन पासपोर्ट अॅक्ट आणि फॉरेनर्स अॅक्ट अंतर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे.

Web Title: Unlucky in love Pak man walks to Indian border to get shot