बलात्काराप्रकरणी भाजप आमदाराच्या भावाला अटक 

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

आमदार कुलदीपसिंग सेंगार यांनी त्यांच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'हे सगळे आरोप माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी केले आहेत. विरोधकांनी माझ्याविरूध्द रचलेला हा कट आहे', असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

उन्नाव (उत्तर प्रदेश) : भाजप आमदाराने व त्याच्या भावाने बलात्कार केल्यामुळे न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर आलेल्या तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काल या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांना जाग आली व त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार कुलदीपसिंग सेंगार यांच्या भावाला म्हणजेच अतुल सेंगार याला अटक केली आहे. 

आमदार कुलदीपसिंग सेंगार यांनी त्यांच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'हे सगळे आरोप माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी केले आहेत. विरोधकांनी माझ्याविरूध्द रचलेला हा कट आहे', असे त्यांनी माध्यमांना सांगितले. तक्रारदार हे खालच्या वर्गातले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिस हे लवकरच या प्रकरणाचा शोध घेतील व योग्य आरोपींना पकडतील. असेही त्यांनी सांगितले. 

आत्महत्येपूर्वी महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, 'भाजप आमदार कुलदीप सिंह व त्याच्या भावाने माझ्यावर एक वर्षापूर्वी बलात्कार केला होता. बलात्काराची तक्रार करूनही वर्षभरात कोणतीही कारवाई झाली नाही. मलाच वारंवार धमकी दिली जात होती. या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आली. परंतु, काहीही झाले नाही. बलात्कार करणाऱयांना अटक झाली नाही तर आत्महत्या करेल.'

दरम्यान यासंबंधी सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुढील तपास चालू आहे.   

Web Title: Unnao gang-rape Cops arrest BJP MLAs brother Atul Singh Senger