अयोध्येतलं राम मंदिर पूर्णत्वाकडे; आज योगी गाभाऱ्याची पायाभरणी करणार

या कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून अनेक साधूसंत-महंतांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
Yogi Adityanath
Yogi AdityanathSakal

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज राम मंदिराच्या गाभाऱ्याची पायाभरणी करणार आहेत. गाभाऱ्यातला पहिला दगड लावण्याचा समारंभ आज पार पडणार आहे. या समारंभात योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहे. या मंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाली होती.

Yogi Adityanath
राम मंदीर शिलान्यासासाठी गोदावरीचे जल आणि माती- विहिंप 

या कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून अनेक साधूसंत-महंतांना आमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येतल्या या राम मंदिराच्या उभारणीला चांगलाच वेग आलेला आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराची पायाभरणी केली होती. तेव्हापासून हे बांधकाम सुरू आहे.

Yogi Adityanath
राम मंदिर दर्शनासाठी लवकरच होणार खुले; तारीख आली समोर

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अयोध्येतल्या बाबरी मशीद- राम जन्मभूमीच्या जागेवर निर्णय दिला होता. त्यामध्ये ही जागा रामलल्लाची असल्याचा निकाल देण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com