यूपीत काँग्रेसला धक्का; माजी केंद्रीय मंत्र्याचा भाजप प्रवेश

jitin prasad
jitin prasad
Summary

काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. अखेर या नेत्याचे नाव समोर आले आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. अखेर या नेत्याचे नाव समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ते दुपारी 1 वाजता भाजप कार्यालयात कमळ हाती घेतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांचा भाजप प्रवेश होईल. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी भाजप प्रवेश करुन आपली खदखद बाहेर काढली आहे. (up congress leader jitin prasad join bjp jp nadda)

पक्षातील अंतर्गतबाबींवर नाराजी व्यक्त करत काँग्रेसमधील 23 नेत्यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिलं होतं. या नावांमध्ये जितिन प्रसाद यांचाही समावेश होता. 2014 ची लोकसभा निवडणूक, 2017 ची विधानसभा निवडणूक आणि 2019 ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढवताना त्यांना पराभव झाला होता. शिवाय काँग्रेस महासचिव म्हणून प्रियांका गांधी यांची निवड झाल्याने ते साईडलाईन झाले होते. तेव्हापासून ते भाजपच्या संपर्कात होते. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग पत्करला. विशेष म्हणजे जितिन प्रसाद यांचे वडील जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती.

jitin prasad
77 वर्षांचे 'रायडर' आजोबा; स्कुटीवरुन पालथा घातला देश

काही महिन्यामध्ये देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे. यात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मनीपूर आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष विविध पातळ्यांवर प्रयत्न करताना दिसत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामुळे आता उत्तर प्रदेशात भाजपला इन्कमिंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com