esakal | महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची परिस्थिची चिघळणार!

बोलून बातमी शोधा

corona virus in nashik

एप्रिलअखेरपर्यंत उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेलं राज्य होऊ शकतं असं निती आयोगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैठकीत सांगितलं आहे.

महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची परिस्थिती चिघळणार!

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

एप्रिलअखेरपर्यंत उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेलं राज्य होऊ शकतं असं निती आयोगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैठकीत सांगितलं आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. मात्र, उत्तर प्रदेशमधील सध्याची परिस्थिती पाहाता एप्रिल महिन्याअखेर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निती आयोगानं व्यक्त केली आहे. याबाबत केंद्रानं उत्तर प्रदेश सरकारलाही सूचना केल्या आहेत. निती आयोगाचे सदस्य व्हि के पॉल यांनी मोदीसोबत झालेल्या करोनाच्या आढावा बैठकीत उत्तर प्रदेशमधील भयावय परिस्थितीची जाणीव करुन दिली आहे. उत्तर प्रदेश भारतातील सर्वाधिक कोरोना प्रभावीत राज्य होऊ शकतं असेही सांगितलं आहे. Economic Times नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशमधील परिस्थिती अतिशय चिंताजनक होत चालली आहे. येथील प्रमुख शहरात आणि ग्रामिण भागात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे अनेकांची अबळ होत चालली आहे. अनेकांना आपले प्राणही गमावावे लागले आहेत. रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनच्या असणाऱ्या कमतरतेमुळे अनेक कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. कानपूर, प्रयागराज, वाराणसी, लखनऊ, गौतमबुद्धनगर, गाजियाबाद आणि मेरठ सारख्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 10 टक्के रुग्ण एकट्या उत्तर प्रदेशमधून येत आहेत. भविष्यात ही परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या तीन लाखांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा: दिलासा..रोजच्या कोरोना बाधितांचा आलेख स्थिर

एप्रिलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं आधिक वेग घेतला. एप्रिल महिन्यात पाच दिवसाच्या दैनिक सरासरीनुसार सात दिवसांत कोरोनाची आकडेवारी सात हजारांपर्यंत वाढली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची वाढ आधिक वेगानं होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, 22 फेब्रुवारी उत्तरप्रदेशमध्ये फक्त 75 रुग्ण आढळले होते. पुढील 48 दिवसांत परिस्थिती चिंताजनक झाली असून एप्रिलच्या सुरुवातीला प्रतिदिवस सात हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. निती आयोगानं बैठकीत सांगितलेल्या अंदाजानुसार, 30 एप्रिल पर्यंत उत्तर प्रदेशमध्ये एक लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण प्रत्येक दिवसाला आढळतील. महाराष्ट्र 99, 665 आणि छत्तीसगढमध्ये 61, 474 इतके नवीन रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं राज्यांना कोरोनाबाधित रुग्णांनुसार शहराचं तीन प्रकारात विभागणी करण्यात यावी अशा सुचना दिल्या आहेत. कमी, मध्यम आणि उच्च या तीन प्रकारात शहराची विभागणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.