योगींच्या राज्यात भाजपला मोठा धक्का; मथुरा, आयोध्या आणि काशीत पराभव

योगींच्या राज्यात भाजपला मोठा धक्का; मथुरा, आयोध्या आणि काशीत पराभव

UP Panchayat Election Result 2021 : पश्चिम बंगालमध्ये 200 पारचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर भाजपला योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पंचायत निवडणूकीत (UP Panchayat Election) अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीनं (Samajwadi Party) भाजपचा पराभव केला आहे. मथुरा, आयोध्या आणि काशीसह इतर राज्यात भाजपाचा पराभव केल्याचा दावा समाजवादी पार्टीने केला आहे. भाजपने पंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. (UP Panchayat Election Result ayodhya mathura kashi bjp lose sp bsp winning yogi adityanath)

  • आयोध्यामध्ये काय आहे परिस्थिती ?

    आयोध्यमध्ये (Ayodhya) भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागतेय. पंचायत समितीच्या (UP Panchayat Election) 40 पैकी 24 जागांवर समाजवादी पार्टीनं (Samajwadi Party) विजय नोंदवल्याचा दावा केलाय. सहा भाजप तर 12 जागांवर अपक्ष उमेदवारनं झेंडा फडकावल्याचं वृत्त आहे. भाजपला बंडखोर नेत्यांचा फटका बसला आहे. 13 जागांवर सीट न मिळाल्यामुळे अपक्ष उभा राहिले होते.

  • मोदींच्या मतदार संघात सपाचा विजय -

    पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघात अखिलेश यादव (Akhilesh Yadav)यांच्या समाजवादी पार्टीनं अतुलनीय कामगिरी केल्याचं चित्र आहे. वाराणसी आणि काशीमध्ये भाजपाचा पराभव केल्याचा दावा सपानं केला आहे. एमएलसी निवडणूकीनंतर समाजवादी पार्टीनं पंचायत निवडणूकीतही भाजपचा पराभव केलाय. येथील 40 पैकी फक्त 8 जागांवर भाजप विजयी झाल्याचा दावा समाजवादीनं केलाय. तर 14 जागांवर सपानं विजयाचा दावा ठेलाय. मायावतीच्या बसपानं येथे 5 जागेवर विजय नोंदवला आहे. (UP Panchayat Election)

योगींच्या राज्यात भाजपला मोठा धक्का; मथुरा, आयोध्या आणि काशीत पराभव
"ममतांनी संदेश दिलाय, मोदी-शहा हे अजिंक्य नाहीत त्यांनाही पराभूत करता येतं"
  • मथुरामध्येही भाजपची पिछेहाट -

    मधुरामध्ये (Mathura) बहुजन समाजवादी पार्टीनं (Bahujan Samaj Party) विजयाचा दावा केलाय. 12 जागांवर बसपा, 8 जागांवर आरएलडी आणि 9 जागांवर बाजपच्या उमेदवारानं विजय नोंदवलाय. सपाला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

  • 2022 च्या विधानसभा निवडणूकीची चाचपणी -

    निर्मितीपासूनच भाजपाच्या (BJP) अजेंड्यात आयोध्या, मधुरा आणि काशी यांचा उल्लेख आहे. यावर भाजपनं उत्तर प्रदेशमध्ये सत्ताही मिळवली. 2022 मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी रंगणार आहे. त्यापूर्वी आता झालेली पंचायत समितीची निवडणूक एक प्रकारची चाचपणी असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com