'बोल देना पाल साहब आए थे', दुचाकीवरील फॅन्सी नंबर प्लेट भोवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fancy Number Plate

'बोल देना पाल साहब आए थे', दुचाकीवरील फॅन्सी नंबर प्लेट भोवली

लखनौ : तरुणांच्या बदलत्या जीवनशैलीसोबतच दुचाकीच्या फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ तरुणांमध्ये दिसतेय. अनेकजण दुचाकीवर अशा नंबर प्लेट लावून शहरात भाईगिरी करत फिरतात. फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ तीन तरुणांच्या अंगलट आली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून उत्तर प्रदेश पोलिसांचं (Uttar Pradesh Police) ट्विट देखील व्हायरल होत आहे.

हेही वाचा: 'मुंगेरीलाल के हसीन सपने', पराभवावरून फडणवीसांचा काँग्रेसला टोला

उत्तर प्रदेशातील ओरैया पोलिसांनी हेल्मेट न घातलेले तिघांना अडवलं. त्यांच्या गाडीवरील नंबर प्लेट पाहून पोलिसांना हसू आलं. त्यावर 'बोल देना पाल साहब आए थे' असं लिहिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही मुलांना अटक केली आहे. हे तिघेही कानपूर ग्रामीण भागातून ओरैया येथील अनेपूर गावात असलेल्या साई मंदिरात दर्शनासाठी आले होते. या तिन्ही मुलांचा फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील एक मजेशीर ट्विट केले आहे. आज 'बोल देना पल साहब आए थे' अशी मोटरसायकल पाहिली, त्यावर बसलेल्या तरुणांना पाल साहेबांची गाडी येतेय हे माहिती नव्हते, असं उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिलंय.

फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध

मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटार वाहन नियम-1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. तरीही असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू असते. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. स्वतः आणि गाडीची ओळख लपवण्यासाठी गाडीच्या क्रमांकाला आई, भाईचा आकार देणाऱ्या वाहनचालकांचा सुळसुळाट वाढत असतो.

Web Title: Up Police Arrested Three People For Fancy Number Plate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uttar Pradeshcrime
go to top