सोनिया गांधी अखेरच्या क्षणी सक्रीय; घेतली वरिष्ठांची बैठक 

वृत्तसंस्था
रविवार, 19 मे 2019

केंद्रात सत्तेसाठी 'धजद'चा काँग्रेसला पाठिंबा 
निवडणूक निकालापूर्वीच केंद्रात सरकार स्थापन करण्यास कॉंग्रेसला संपूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा माजी पंतप्रधान व "धजद'चे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी केली. 

नवी दिल्ली : संपूर्ण निवडणुकीत पडद्याआड राहिलेल्या "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी अखेरच्या महत्त्वाच्या क्षणी पुढे आल्या असून, त्यांनी बैठक घेत निकालानंतर सरकार स्थापनेबाबतच्या कॉंग्रेस पक्षाच्या धोरणावर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.

या बैठकीला पक्षाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, अहमद पटेल, ए. के. अँटनी आणि इतर काही नेते उपस्थित होते. त्रिशंकू संसदेची शक्‍यता लक्षात घेऊन कॉंग्रेसच्या हालचाली होत असून, सरकार स्थापनेबाबत सर्व ते पर्याय आजमाविले जात आहेत. 

केंद्रात सत्तेसाठी 'धजद'चा काँग्रेसला पाठिंबा 
निवडणूक निकालापूर्वीच केंद्रात सरकार स्थापन करण्यास कॉंग्रेसला संपूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा माजी पंतप्रधान व "धजद'चे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी केली. 

कर्नाटकात कॉंग्रेस- धजद युती सरकार स्थापन केलेल्या धजदने लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील कॉंग्रेस- धजद युती सरकारचे भवितव्य निश्‍चित होणार आहे. आपला पक्ष पंतप्रधानपदासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठिंबा देणार असल्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केल्यानंतर देवेगौडा यांनीही आता त्याला दुजोरा दिला आहे. 

"आम्ही कॉंग्रेससोबत आहोत, यापेक्षा अधिक काय सांगणार? 23 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर देशाचे स्पष्ट चित्र होणार आहे. त्यानंतर पुढील हालचालींना गती येणार आहे. कॉंग्रेसला वगळून देशात सरकार स्थापन करणे प्रदेशिक पक्षांना शक्‍य नसल्याचे देवेगौडा म्हणाले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UPA president Sonia Gandhi meet senior Congress leaders before loksabha election result