दलिताच्या घरात बनविलेले भोजन घेण्यास नकार

वृत्तसंस्था
रविवार, 29 जानेवारी 2017

शाळेतील मुलांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनात फक्त 12 विद्यार्थी ते भोजन खातात. बाकी विद्यार्थी ते भोजन खाण्यास नकार देतात.

भोपाळ - मध्य प्रदेशातील टीकमगड येथे एका शाळेतील उच्चवर्णीय विद्यर्थ्यांनी दलित कुटुंबाच्या घरात बनविलेले माध्यान्ह भोजन घेण्यास नकार दिला आहे.

दलित कुटुंबावर अत्याचाराच्या घटना घडत असतात. मात्र, आता दलित कुटुंबाकडून बनविण्यात येत असलेले माध्यान्ह भोजन घेण्यास नकार देण्यात आला आहे. मध्यप्रदेशमधील टिकमगडमध्ये एक सरकारी शाळा आहे. राज्यातील अन्य शाळांप्रमाणेच या शाळांमध्येही विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. शाळकरी मुलांनी भोजन घेण्यास नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एका मुलाने म्हटले, की शाळेतील मुलांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनात फक्त 12 विद्यार्थी ते भोजन खातात. बाकी विद्यार्थी ते भोजन खाण्यास नकार देतात. तर, शाळेचे मुख्याध्यापकांनी भोजन शाळेतच बनविले जावे अशी मागणी केली आहे. बाहेर जेवण बनविण्यात येत असल्याने विद्यार्थी ते घेण्यास नकार देतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: upper caste school children shun mid day meal cooked at the home of a dalit in tikamgarh madhya pradesh