यूपीएससी पूर्वपरीक्षेवेळी ओळखपत्र सोबत ठेवा

पीटीआय
सोमवार, 29 मे 2017

प्रवेशपत्रावरील छायाचित्राची गुणवत्ता चांगली नसेल, तर अशा परीक्षार्थींनी आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्राची पत्र आणि दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सोबत आणावीत, असे आयोगातर्फे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) 18 जून रोजी घेण्यात येणाऱ्या पूर्वपरीक्षेच्या प्रवेशपत्रावरील उमेदवाराच्या छायाचित्राची गुणवत्ता चांगली नसल्यास अशा परीक्षार्थींनी आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्राची प्रत, तसेच दोन छायाचित्रे परीक्षेवेळी बरोबर ठेवावीत, अशी सूचना आयोगातर्फे देण्यात आली आहे.

यूपीएससीतर्फे 18 जून रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार असून, त्यासाठीची ई-प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रवेशपत्रावरील छायाचित्राची गुणवत्ता चांगली नसेल, तर अशा परीक्षार्थींनी आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्राची पत्र आणि दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सोबत आणावीत, असे आयोगातर्फे स्पष्ट केले आहे. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पासपोर्ट किंवा मतदान ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल, तसेच उमेदवारांना परीक्षेवेळी प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे.

यूपीएससीतर्फे दरवर्षी तीन टप्प्यांत परीक्षा घेतली जाते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय प्रशासकीय सेवा (आयपीएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आदीं सेवांसाठी निवड करण्यात येते.

Web Title: UPSC candidates should carry identity proof