UPSC परीक्षेत बदल शक्य; अहवाल सादर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

हा अहवाल आयोगाने स्वीकारला तर युपीएससीच्या परीक्षेच्या स्वरुपात बदल होण्याची शक्‍यता आहे. 

नवी दिल्ली - भारतीय प्रशासकीय सेवा आणि अन्य उच्चस्तरीय अधिकारी पदांची भरती करण्यासाठी परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यासंदर्भात आयोगाने स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल आयोगाकडे पाठविला आहे. या अहवालावर आयोगाकडून विचार करण्यात येत आहे. हा अहवाल आयोगाने स्वीकारला तर युपीएससीच्या परीक्षेच्या स्वरुपात बदल होण्याची शक्‍यता आहे. 

ऑगस्ट 2015 मध्ये युपीएससीने परिक्षेच्या स्वरुपात बदल सुचविण्यासाठी मानव संसाधन विकास विभागाचे सचिव आणि निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी बी एस बासवान यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल युपीएससीकडे सादर केला आहे. यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, "बासवान समितीने सादर केलेला अहवाल युपीएससीकडे सादर केला आहे. युपीएससीकडून त्यावरील शिफारशी अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत.' 

बासवान समितीने परीक्षेचे नियोजन, पेपर्सची संख्या, परीक्षेचे स्वरुप आणि कालावधी, गुणांकनाची पद्धती, पेपर तपासण्याची पद्धती आदी बाबींचा अभ्यास केला असून त्यासंदर्भातील शिफारशी मांडल्या आहेत.
 

Web Title: UPSC examining report on change in civil services exam: Govt