यूपीएससी ‘टॉपर्स’ अडकले विवाहबंधनात

वृत्तसंस्था
सोमवार, 9 एप्रिल 2018

या दोघांचे लग्न हे लव्ह जिहादचा प्रकार असल्याची टीका हिंदू महासभेकडून केली गेली. तसेच तिच्या आई वडिलांनी तिला योग्य मार्गदर्शन करावे असेही सांगण्यात आले होते. पण या सगळ्यावर मात करत या दोघांनी लग्न केले.    

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत 2015 साली प्रथम आलेली टीना डाबी व याच परीक्षेत द्वितीय आलेला अतहर आमिर हे दोघं शनिवारी विवाहबंधनात अडकले. जम्मू काश्मिरमधली पहलगाम येथे नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचा विवाह थाटामाटात पार पडला. 

टीना व अतहर हे आयएएस ट्रेनिंग दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांचे धर्म वेगळे असल्याने देशभरातून त्यांच्यावर सडकून टीका झाली. पण अशा कोणत्याही टीकांना त्यांनी भीक घातली नाही. त्यांनी त्यांच्या प्रेमाबद्दल कोणताही आडपडदा ठेवला नाही. मीडियाच्या माध्यमातून दोघांनीही आपले प्रेम व्यक्त केले व अखेरीस हे दोन यूपीएससी टॉपर्स विवाहबंधनात अडकले.   

या दोघांचे लग्न हे लव्ह जिहादचा प्रकार असल्याची टीका हिंदू महासभेकडून केली गेली. तसेच तिच्या आई वडिलांनी तिला योग्य मार्गदर्शन करावे असेही सांगण्यात आले होते. पण या सगळ्यावर मात करत या दोघांनी लग्न केले.    

Web Title: upsc toppers get married after huge oppose