CAA : पुरस्कार वापसीला सुरवात; मुजतबा हुसैन 'पद्मश्री' परत करणार

वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध होत असताना हैदराबादेतील उर्दू लेखक मुजतबा हुसैन यांनी त्यांचा "पद्मश्री' हा किताब केंद्र सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील विद्यमान स्थितीवर आपण फारसे समाधानी नाही आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

हैदराबाद : नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध होत असताना हैदराबादेतील उर्दू लेखक मुजतबा हुसैन यांनी त्यांचा "पद्मश्री' हा किताब केंद्र सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील विद्यमान स्थितीवर आपण फारसे समाधानी नाही आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून, लोकशाही धोक्‍यात सापडली आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभा केलेला लोकशाहीचा पाया दुभंगला आहे. सध्या देशामध्ये कोणतीही व्यवस्था नाही. कुणीतरी सकाळी सात वाजताच शपथ घेतो, रातोरात सरकारे बनविली जातात, सध्या देशामध्ये भीतीचे वातावरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमध्ये पेटलेला आंदोलनाचा वणवा आणखी उग्र झाला आहे. सीलमपूर-जाफराबाद परिसरामध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत वाहनांची मोडतोड केली होती. संतप्त आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करत अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. या घटनेनंतर मेट्रो स्थानकेही बंद करण्यात आली होती. 

Image result for mujtaba hussain"
 

आणखी बातम्या वाचा :

आता रेशन दुकानावर स्वस्त दरात मिळणार मटण, चिकन, अंडी अन् मासे ! 

अशाने राज्याची मान खाली जाते; फडणवीसांकडून खोटा व्हिडिओ ट्विट 

'ते भगवी वस्त्रे घालतात अन्‌ बलात्कार करतात'

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urdu writer Mujtaba Hussain returns Padma award in protest against CAA and NRC