ऊर्जित पटेलांची 6 जुलैला संसदीय समितीसमोर हजेरी

पीटीआय
शनिवार, 10 जून 2017

नवी दिल्ली - संसदीय समितीसमोर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल 6 जुलैला हजर राहणार आहेत. नोटाबंदीनंतर बॅंकांकडे जमा झालेल्या रद्द नोटांच्या तपशिलाबाबत त्यांच्याकडे विचारणा होणे अपेक्षित आहे. 

संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीसमोर पटेल उपस्थित राहण्याची ही चौथी वेळ असणार आहे. या समितीचे अध्यक्ष कॉंग्रेसचे खासदार वीरप्पा मोईली आहेत. पटेल याआधी 18 जानेवारीला समितीसमोर हजर झाले होते. त्यानंतर दोन वेळा त्यांनी पतधोरण आढाव्यामुळे व्यग्र असल्याचे कारण देत उपस्थित न राहण्याची सवलत घेतली होती. रिझर्व्ह बॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा 6 व 7 जूनला झालेला आहे. 

समितीचे सदस्य व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांना बोलाविण्याचा आग्रह धरला होता. याला समितीतील भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला होता. जानेवारीमध्ये समितीच्या काही सदस्यांनी ऊर्जित पटेल यांना धारेवर धरल्यानंतर मनमोहनसिंग यांनीच त्यांची यातून सुटका केली होती. केंद्र सरकारने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 

Web Title: urjit patel marathi news new delhi news note ban