
''अमेरिकाही भारताचे म्हणणे ऐकून घेत अंमलबजावणीचा प्रयत्न करते''
लखनऊ : जगात 2014 पासून भारताची प्रतिष्ठा, आणि विश्वासार्हता वाढली आहे. यापूर्वी भारताला गांभीर्याने घेतले जात नव्हते. आज अमेरिकाही (America) भारताचे म्हणणे ऐकून घेते आणि अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करते. नेतृत्व प्रभावी असेल तर, विकास कोणीही रोखू शकत नाही असे म्हणत संरक्षण क्षमता आणि अर्थव्यवस्था देशाची ताकद ठरवतात असे ते म्हणाले. लखनऊ इंटेलेक्चुअल फाऊंडेशनतर्फे आयोजित नमस्ते लखनऊ विथ राजनाथ सिंह या कार्यक्रमात ते बोलत होते. (Rajnath Singh News)
हेही वाचा: केतकी चितळेविरोधात पुण्यात गुन्हा, राष्ट्रवादी आक्रमक झाल्याने लवकरच अटक?
भारताने ताकद दाखवली
इंडो-चायना स्टँडच्या माध्यमातून भारताला चीनला आपल्या शक्तीची जाणीव करून दिली असून, काही झाल्यास भारत परिणामांची चिंता करणार नाही पण स्वाभिमानाशीही तडजोड करणार नाही. सुरक्षा व्यवस्थेत भारताला इतर देशांवर अवलंबून राहायचे नसल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले. त्यासाठीच 309 शस्त्रांची निर्मिती भारतात केली जाणार आहे.
हेही वाचा: एक देश, एक भाषेचे आव्हान अमित शहांनी स्वीकारावे : राऊत
तर भारताची अर्थव्यवस्था 4.3 ट्रिलियन डॉलर असती
जर कोरोना आणि युक्रेन-रशिया युद्ध झाले नसते तर, देशाची अर्थव्यवस्था 4.3 ट्रिलियन डॉलर इतकी झाली असती, असे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. भारताप्रमाणेच अमेरिका आणि चीनमध्येही महागाईचे संकट असून, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला असल्याचे सिंह यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय व्यापार वाढत असून, महागाई रोखण्यासाठी आरबीआयने योग्य ती पावले उचलली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रिंग रोड हा लखनऊचा ड्रीम प्रोजेक्ट होता, तो पूर्ण होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रिंगरोडचे काम जलदगतीने पूर्ण करण्यास सांगितले असून, या कामाचा वेग वाढवण्यासाठी नितीन गडकरींशीही चर्चा केल्याचे ते म्हणाले. गोमतीनगर रेल्वे स्थानक होणार असून ते जागतिक दर्जाचे होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील जनता समाधानी नसती तर एवढ्या बहुमताने भाजपचे सरकार स्थापन करणे शक्य झाले नसते.
Web Title: Us Also Listens To India And Tries To Implement Says Defence Minister Rajnath Singh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..