
अमेरिकेने (America) पाकिस्तानला (Pakistan) एक दणका दिला असून अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानमध्ये प्रवास करण्याचे टाळण्यास सांगितले आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेने (America) पाकिस्तानला (Pakistan) एक दणका दिला असून अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानमध्ये प्रवास करण्याचे टाळण्यास सांगितले आहे. अमेरिकेने नागरिकांना कोविड-19 (CoronaVirus) महामारी आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये जाण्यास टाळण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाला आरोग्य नियंत्रण केंद्राने दिलेल्या नोटीस दिली आहे. पाकिस्तानला यामध्ये आरोग्याबाबत तृतिय श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे.
ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अमेरिकी नागरिकांना बलूचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतासोबत पूर्व पाकिस्तानमध्ये न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचे कारण देताना या भागात मोठ्या प्रमाणात आतंकवाद वाढलेला असून आणि अपहरणाच्याही घटना घडत आहेत.
दरम्यान, अमेरिकेने यामध्ये पाकिस्तानला एक दिलासा दिला आहे. २०१४च्या तुलनेत पाकिस्तानमध्ये आता काही प्रमाणात दहशतवादी घटना कमी झाल्याचे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये २०१४ला दहशतवादाविरोधी एक मोठे अभियान चालविण्यात आले होते.