अमेरिकेची व्हिसा प्रक्रिया फक्त मुंबईतच

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 मार्च 2018

नवी दिल्ली : व्हिसाशी संबंधित सर्व प्रक्रिया मुंबई येथील केंद्रावर होणार असल्याने दिल्लीतील अमेरिकी दूतावासाकडून येत्या एक एप्रिलपासून आयआर 5, आयआर 1, आयआर 2, सीआर 1 किंवा सीआर 2 या व्हिसांवर प्रक्रिया होणार नाही.

त्यामुळे अमेरिकी नागरिकाचे पालक, पत्नी अथवा अल्पवयीन अपत्य यांना अमेरिकेत स्थलांतर करण्याच्या दृष्टीने व्हिसा मिळविण्यासाठी आता मुंबई गाठावी लागणार आहे.

ज्या व्यक्तींना दिल्लीतील कार्यालयाने मुलाखतीसाठी एक एप्रिलनंतरची तारीख पूर्वीच दिली असेल, त्यांना पत्र पाठवून नवे ठिकाण कळविले जाईल, असे अमेरिकी दूतावासातर्फे सांगण्यात आले आहे.

Web Title: US Embassy to accept Visa Applications only in Mumbai