अमेरिकेतील संघटनांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन : अमेरिकेतील उद्योग संघटनेने केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उल्लेखनीय कामगिरी करीत दूरदृष्टीने देशांतर्गत अर्थव्यवस्थेला गती देत परकी गुंतवणूकदारांकडे लक्ष दिले, असे अमेरिका- भारत व्यवसाय परिषदेने म्हटले आहे.

परिषदेने म्हटले आहे, की जागतिक अनिश्‍चिततेच्या काळात अर्थसंकल्प मांडणे आव्हानात्मक होते. अर्थमंत्र्यांनी वित्तीय शिस्त कायम ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने व्यवसाय करण्यात सुलभता आणण्याच्या धोरणाच्या दिशेने पुढे वाटचाल कायम ठेवली आहे. तसेच, नोटाबंदीचा नकारात्मक परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परवडण्यायोग्य घरांच्या क्षेत्रात सरकारने केलेल्या सुधारणा स्वागतार्ह आहेत. यामुळे सर्वांसाठी घर हे स्वप्न साकार होणार आहे. दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील करात सवलत आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा यामुळे घरांच्या बाजारपेठेला वेग येईल.

""अर्थसंकल्पात सरकारने डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. याचवेळी परकी गुंतवणूक आकर्षित करण्याला प्राधान्य दिले आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रावरील खर्च वाढविण्यात आला असून, कर रचना अधिक वास्तववादी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात विकासाची गती वाढावी यावर विशेष भर अर्थसंकल्पात देण्यात आला आहे,'' असे परिषदेने म्हटले आहे.

Web Title: us india council lauds jaitley for budget