डोनाल्ड ट्रम्प यांना 'गार्ड ऑफ ऑनर'

वृत्तसंस्था
Tuesday, 25 February 2020

राजघाटला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांचे भारतात आगमन झाल्यानंतर काल (सोमवार) जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर आता त्यांना राष्ट्रपती भवनात तिन्ही सैन्य दलांकडून 'गार्ड ऑफ ऑनर' प्रदान करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज घाटला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली असून, भारत आणि अमेरिका द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना 'गार्ड ऑफ ऑनर' प्रदान करण्यात आला. त्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, व्ही. के. सिंग हेदेखील उपस्थित होते. 

ट्रम्प म्हणतात, दहा वर्षांत भारतातील गरिबी हटणार

डोनाल्ड ट्रम्प यांनी हजारोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने मोटेरा स्टेडियमवर त्यांनी भारतीय संस्कृती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमनं उधळली. 

राजघाटवर लावले झाड

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी जेव्हा राज घाट येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने राज घाटवर झाड लावले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US President Donald Trump accorded Tri Services Guard of Honour at Rashtrapati Bhavan