राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा आज निर्णय जाहीर केला. मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नसल्याचा आरोप करत अमेरिका अनेक वर्षांपासून परिषदेबाहेर बाहेर पडण्याची धमकी देत होता. 
 

न्यूयॉर्क - अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा आज निर्णय जाहीर केला. मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नसल्याचा आरोप करत अमेरिका अनेक वर्षांपासून परिषदेबाहेर बाहेर पडण्याची धमकी देत होता. 

47 सदस्यांची मानवाधिकार परिषद ही इस्त्राईलविरोधी असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॅम्पिओ आणि संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या प्रतिनिधी निकी हेली यांनी पत्रकार परिषदेत मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा केली. अमेरिका तीन वर्षांपासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेचा सदस्य आहे. आता केवळ दीड वर्षाचाच कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे कालावधी पूर्ण होण्याच्या आताच अमेरिका बाहेर पडले आहे. मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नसल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या.

तसेच, अमेरिकेच्या मागण्याही मान्य केल्या नसल्याचे निदर्शनास आले होते. अशा स्थितीत अमेरिका परिषदेतून बाहेर पडू शकतो, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. केवळ औपचारिक घोषणा होणेच बाकी होते आणि आज त्यासंदर्भातील घोषणा झाली. अमेरिकेने माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कालावधीतही तीन वर्षांपर्यंत मानवाधिकार परिषदेचा बहिष्कार घातला होता. मात्र, ओबामा अध्यक्ष झाल्यानंतर 2009 रोजी या परिषदेत अमेरिका पुन्हा सहभागी झाले. संयुक्त राष्ट्रसंघातील इस्त्राईलचे राजदूत डॅनी डानोन यांनी अमेरिकेच्या घोषणेचे स्वागत केले आहे. 

Web Title: US quits UN human rights council