भारतात इसिस हल्ल्याचा अमेरिकेचा इशारा

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने भारतातील पर्यटनाच्या ऐन मोसमात परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट होऊ शकते. इसिस या दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

राजधानी दिल्लीतील अमेरिकन दुतावासाने भारतातील दहशतवादी हल्ल्याबाबत सावधानतेचा इशारा अमेरिकन नागरिकांना दिला आहे. इसिस येथील पाश्चिमात्य पर्यटकांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. 
इसिसच्या नुकत्याच पकडण्यात आलेल्या एका संशयित दहशतवाद्याने यासंदर्भातील खुलासा केला आहे. 

अमेरिकन नागरिकांना सुरक्षा संदेश अशा शीर्षकाखाली देण्यात आलेल्या 'अलर्ट'मध्ये अमेरिकन दुतावासाने म्हटले आहे की, भारतात पाश्चात्य पर्यटक ज्या ठिकाणांना नेहमी भेट देतात तिथे धोका वाढला आहे. यामध्ये धार्मिक उत्सवाची ठिकाणे, बाजारपेठा, तीर्थस्थळांचा समावेश आहे. 
 
Web Title: US warns its citizens in India of IS attack