पाकचा दहशतवाद्यांना पाठिंबा सहन केला जाणार नाही : हेली 

पीटीआय
शुक्रवार, 29 जून 2018

दहशतवादी गटांसाठी पाकिस्तान स्वर्ग बनत आहे, हे कदापि सहन केले जाणार नाही आणि अमेरिकेने यापूर्वीच इस्लामाबादला तसा संदेश दिला असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी आज येथे सांगितले. 

नवी दिल्ली : दहशतवादी गटांसाठी पाकिस्तान स्वर्ग बनत आहे, हे कदापि सहन केले जाणार नाही आणि अमेरिकेने यापूर्वीच इस्लामाबादला तसा संदेश दिला असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी आज येथे सांगितले. 

दहशतवाद्यांना आश्रय दिला जात असताना आम्ही डोळे बंद करू शकत नाही. हे सहन केले जाणार नाही, असे पाकिस्तानला सांगण्यात आले आहे, असे हेली यांनी येथे एका व्याख्यानात बोलताना स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, की दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत आणि अमेरिका जगाचे नेतृत्व करतील. विविध मुद्द्यांना स्पर्श करताना हेली यांनी धार्मिक स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहे आणि यामुळे सहिष्णुतेच्या आधारे देशाला एकसंध ठेवले जाऊ शकते असेही नमूद केले. 

चीनविषयी त्या म्हणाल्या, की हा देश महत्त्वाचा आहे. पण प्रदेशातील त्यांच्या हालचाली अमेरिका तसेच अन्य अनेक देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. बीजिंगने लोकशाही मूल्यांचा सन्मान राखला पाहिजे. हेली यांनी आज दिल्लीमध्ये मंदिरे, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारांनाही भेटी दिल्या. 

Web Title: US won't tolerate Pakistan becoming haven for terrorists says Nikki Haley