फुटीरतावाद्यांकडून मुलांचा ढालीसारखा वापर : मेहबूबा

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

उधमपूर - जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज फुटीरतावाद्यांना लक्ष्य केले. नवी पिढी दगडफेक करण्यासाठी अशिक्षित राहावी आणि तोफगोळ्यांचे बळी म्हणून त्यांचा वापर करता यावा, यासाठी फुटीरतावादी खोऱ्यात शाळा चालवून देत नसल्याचा आरोप मेहबूबा यांनी केला.

फुटीरतावादी गरीब कुटुंबांतील मुलांना हेरून त्यांना लष्करी तळ, पोलिस ठाणी आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) शिबिरांवर हल्ल्यासाठी उत्तेजन देत आहेत आणि त्यांचा ढालीसारखा वापर करत आहेत. त्याचवेळी स्वत:च्या मुलांना मात्र सुरक्षित ठेवत आहेत, असा हल्लाही मेहबूबा यांनी चढविला.

त्या म्हणाल्या, की युवकांना जर शिक्षण मिळाले, तर ते फुटीरतावाद्यांसाठी दगडफेक करणार नाहीत. त्यांच्या नेत्यांना मात्र त्यांच्यासाठी दगडफेक करू शकतील, असे अशिक्षित युवक हवे आहेत. शाळा उघडल्या, गरीब मुलांना शिक्षण मिळाले, तर त्यांच्याकडे दगडफेकीसाठी वेळ नसेल आणि कदाचित त्यासाठी ते तयारही होणार नाहीत, असे मोठ्या नेत्यांना वाटत असल्याचे आज मी पाहात आहे. केंद्र सरकारनेही फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी त्यांचे दरवाजे बंद ठेवले.

Web Title: Use of children in Jammu as security : Mehbooba