भारतीय भाषांमुळे वाढतील इंटरनेट यूजर्स 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 मार्च 2018

इंटरनेटच्या वापराची भाषा इंग्रजी असल्यामुळे त्याच्या विस्ताराला मर्यादा निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांना आपल्या पसंतीच्या, प्रादेशिक भाषेत इंटरनेट वापराची संधी मिळाली, तर एकूण वापरकर्त्यांमध्ये 20.5 कोटींची भर पडेल, असा विश्वास इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या (आयएएमएआय) अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : इंटरनेटच्या वापराची भाषा इंग्रजी असल्यामुळे त्याच्या विस्ताराला मर्यादा निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांना आपल्या पसंतीच्या, प्रादेशिक भाषेत इंटरनेट वापराची संधी मिळाली, तर एकूण वापरकर्त्यांमध्ये 20.5 कोटींची भर पडेल, असा विश्वास इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या (आयएएमएआय) अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

'आयएएमएआय'च्या 'इंटरनेट इन इंडिक' या अहवालानुसार डिसेंबरपर्यंत देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 48.1 कोटींवर गेली आहे. जगभरात चीननंतर सर्वाधिक इंटरनेट वापरकर्ते भारतात आहेत. जूनपर्यंत देशातील इंटरनेट यूजरची संख्या पन्नास कोटींपर्यंत पोचण्याची शक्‍यता असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशातील 170 शहरांमधील साठ हजार व्यक्ती आणि ग्रामीण भागातील 750 गावांतील व्यक्तींशी संपर्क साधून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे भारतीय भाषांमध्ये इंटरनेट उपलब्ध झाल्यास इंटरनेटशी कधीही संबंध न आलेली 23 टक्के जनता या माध्यमाचा वापर करू शकेल. 

चीनमध्ये इंटरनेटची भाषा मॅंडेरिन 
चीनने इंटरनेटच्या वापराला प्रोत्साहन देतानाच त्यावरील मजकूर मॅंडेरिन भाषेतच उपलब्ध होईल, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे चीनमध्ये इंटरनेट वापराचे प्रमाण जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे. इंटरनेटवर इंग्रजीनंतर सर्वाधिक वापरली जाणारी भाषा म्हणून आज मॅंडेरिन ओळखली जाते. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या एकूण मजकुराच्या तुलनेत भारतीय भाषांचे प्रमाण 0.1 टक्के इतके किरकोळ आहे. 

भारतीय भाषांवर भर हवा 
- 'डजिटल इंडिया'साठी सरकार प्रयत्नशील 
- 'इंडिक इंटरनेट इकोसिस्टीम'ची गरज 
- या प्रणालीमुळे प्रादेशिक भाषांमधून इंटरनेटचा वापर वाढेल 
- ग्रामीण आणि शहरातील दरी कमी होईल 

Web Title: use of Indian languages will increase internet users