"फक्त सन्माननीय संबोधन वापरावे'

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

चेन्नई : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या नावापुढे "हिज एक्‍सलन्सी' असे संबोधन न वापरण्याच्या सूचना तमिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज दिल्या. "हिज एक्‍सलन्सी' ऐवजी सन्माननीय असे संबोधन वापरावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

येथून पुढे सर्व कार्यक्रमांमध्ये आणि अधिकृतरीत्या संवाद साधताना सन्माननीय असेच संबोधन वापरावे, अशी सूचना विद्यासागर राव यांनी दिली असल्याची माहिती आज राजभवनातर्फे देण्यात आली. यापुढे फक्त विदेशी मान्यवरांसाठीच "हिज एक्‍सलन्सी' हे संबोधन वापरण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटिश काळात राज्यपालांना संबोधित करण्यासाठी "हिज एक्‍सलन्सी' असे संबोधन वापरले जात होते.

राष्ट्रपती मुखर्जी यांनी 2012 मध्ये "हिज एक्‍सलन्सी' ऐवजी सन्माननीय हे संबोधन वापरावे, अशी सूचना केली होती. काही राज्यपालांनीही राष्ट्रपतींचे अनुकरण केले आहे. 

Web Title: use only honorable president