मोर्चाला पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर

यूएनआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

श्रीनगर - जम्मू काश्‍मीरमध्ये सध्या तणाव कायम असताना आज शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर निघालेल्या मोर्चाला पांगविण्यासाठी सुरक्षारक्षकांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. मोर्चामधील काही नागरिक भारतीय लष्कराविरोधात आणि "स्वातंत्र्या'च्या बाजूने घोषणा देत होते.

दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात ही घटना घडली. मोर्चामधील नागरिक स्वयंनिर्णयाचा हक्क देण्याची मागणी करत होते. या मोर्चाला थांबविण्याचा जवानांनी प्रयत्न केला. मात्र, थांबण्याऐवजी मोर्चातील काही जणांनी जवानांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि निदर्शकांना पांगविण्यासाठी जवानांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. या कारवाईत काही नागरिक जखमी झाले. तणावग्रस्त परिस्थितीमुळे राज्यामध्ये एकत्र येण्यावर जनतेवर निर्बंध असतानाही ते झुगारून अनेक नागरिक रस्त्यावर उतरले होते. अनंतनाग आणि श्रीनगरमध्येही नागरिकांनी मोर्चे काढले होते. 9 जुलैपासून राज्यात असलेल्या संघर्षामध्ये 86 नागरिकांचा मृत्यू झाला असून, दहा हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत.

Web Title: the use of tear smoke gathered to march