भारतावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी आम्ही 'जैशे'चा वापर केला, मुशर्रफ यांची कबुली

Pervez-Musharraf
Pervez-Musharraf

इस्लामाबाद - भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानची सर्वच बाजूने कोंडी झाली आहे. आधी जैशे महंमदचे पाकिस्तानात अस्तित्व नसल्याचे पाकिस्तान म्हणत होते. तर त्यासाठी भारताकडे पुराव्यांची मागणी देखील पाक करत होता. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीच जैशे महंमदचा म्होरक्या मसूद अजहर आपल्या देशात असल्याची कबुली दिली. आता मात्र पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी जैशे महंमद या दहशतवादी संघटनेबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. ''माझ्या कारकिर्दीत 'जैश'चा म्होरक्या मसूद अजहर याचा वापर भारतीय भूमिवर हल्ले करण्यासाठी करण्यात आला होता'', असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. 

एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली. पाकिस्तानातील पत्रकार नदीम मलिक यांनी नुकतेच ट्विट केले आहे. त्यामध्ये आपण घेतलेल्या टेलेफोनिक मुलाखतीमध्ये मुशर्रफ यांनी ही कबुली दिल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. या मुलाखतीची दोन मिनिटांची ऑडिओ क्लिप मलिक यांनी ट्विट केली आहे. हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या मुलाखतीदरम्यान मुशर्रफ यांनी अनेक खुलासे केले आहेत. जैशेने माझ्या हत्येचाही कट रचला होता असे सांगताना, त्यांनी दोनदा आपल्यावर झालेल्या हल्ल्यांचा तपशीलही या मुलाखतीत दिला आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत्या दबावामुळे मंगळवारी पाकिस्तानमध्ये जैशेचा म्होरक्या मसूद अजहरचा भाऊ अब्दुल रौफ अजगर आणि इतर 43 दहशतवाद्यांविरोधात अटकेचे आदेश काढण्यात आले. या पार्श्वभूमिवर मुशर्रफ यांनी जैशे ही दहशतवादी संघटना असून, त्याच्या विरोधात करण्यात आलेली कारवाई योग्यच असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, तुमच्या काळत 'जैशे'वर कारवाई का केली नाही? असा प्रश्न विचारल्यावर मात्र मुशर्रफ यांनी त्यावेळची गोष्ट वेगळी होती असे सांगितले. तेसच त्यावेळी पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएसआय' भारतावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी 'जैश'चा वापर करत असल्याचे खळबळजनक खुलासा त्यांनी केला.

असे सांगताना मात्र मुशर्रफ यांनी भारतालाच आरोपी ठरवले आहे. भारताकडून पाकिस्तानात हल्ले केले जात होते आणि त्यांना उत्तर देण्यासाठी आपण भारतात हल्ले घडवून आणत होतो. त्यामुळे आयएसआयने 'जैशे'वर कारवाई केली नाही. तेसच आपणही कुठल्याही मोठ्या कारवाईचा आग्रह धरला नाही असे त्यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com