उषा अनंतसुब्रह्मण्यम यांना जामीन 

Usha Anantasubrahmaniyam bail
Usha Anantasubrahmaniyam bail

मुंबई (पीटीआय) : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 14 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी उषा अनंतसुब्रह्मण्यम यांना सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच, "पीएनबी'चे कार्यकारी संचालक संजीव शरण यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. 

"पीएनबी'नंतर अनंतसुब्रह्मण्यम या अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यांना 14 ऑगस्टला या पदावरून बडतर्फ करण्यात आले. त्यांच्याविरोधात खटला चालविण्यास राष्ट्रपतींनी संमती दिली होती. याची दखल घेऊन या महिन्याच्या सुरवातीला विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध खटल्याचे कामकाज सुरू केले होते. त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. आज त्या न्यायालयात हजर झाल्यानंतर विशेष न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी त्यांना जामीन मंजूर केला. 

"पीएनबी' गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनंतसुब्रह्मण्यम यांचे नाव आहे. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका असताना त्या गैरव्यवहार रोखण्यास असमर्थ ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनी वेळेत योग्य प्रकारची पाऊले न उचलल्याने गैरव्यवहार घडल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. 

अनंतसुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ 
पंजाब नॅशनल बँक : 
कार्यकारी संचालक : जुलै 2011 ते नोव्हेंबर 2013 
व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी : ऑगस्ट 2015 ते मे 2017 

अलाहाबाद बँक : 
व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी : मे 2017 ते ऑगस्ट 2018 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com