इसिसच्या तीन संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी जालंधर, मुंबई आणि बिजनौर येथून इसिसच्या तीन संशयितांना ताब्यात घतेले आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी जालंधर, मुंबई आणि बिजनौर येथून इसिसच्या तीन संशयितांना ताब्यात घतेले आहे.

संशयित दहशतवादी बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून इसिसमध्ये जाण्यास इच्छुक असणाऱ्यांचा शोध घेण्यास मदत करत होते. उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने मुंबई (महाराष्ट्र), जालंधर (पंजाब), नरकतीयागंज (बिहार) आणि मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) येथील पोलिसांच्या संयुक्त कारवाई केली. त्यामध्ये तिघांना ताब्यात घेतले आहे. तर चौकशीसाठी अन्य सहा जणांनाही ताब्यात घेतले आहे. "दहशतवादी कृत्ये करण्याचा कट रचणाऱ्या एका समूहाविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार दिल्ली पोलिसांचे विशेष पथक, आंध्र प्रदेशचे गुन्हे तपास पथक, महाराष्ट्राचे दहशतवादविरोधी पथक, पंजाब आणि बिहारचे पोलिस यांच्या मदतीने कारवाई केली', अशी माहिती उत्तर प्रदेश दहशवादविरोधी पथकातील एका अधिकाऱ्याने दिली. पुराव्याच्या आधारे संशयितांवर पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Web Title: Uttar Pradesh ATS arrests 3 suspected terrorists, may have links to ISIS