वाट चुकलेल्या तरुणांची होणार घरवापसी; एटीएसचा उपक्रम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

...तर एटीएसकडे संपर्क साधा
आपला मुलगा किंवा कुटुंबातील सदस्य दहशतवादाच्या वाटेवर जात असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले आणि त्याला रोखण्यात अपयश आले तर, त्यांनी निश्‍चिंत होऊन एटीएसशी संपर्क साधावा, असे आवाहन एटीएसने केले. पालक, मित्र, इतर व्यक्तींच्या सहकार्याने अशा तरुणांची किंवा व्यक्तींची मने वळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना शिक्षण आणि रोजगारासाठी सहकार्यही केले जाईल, असे एटीएसने म्हटले आहे.

लखनौ - दहशतवादाच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या उत्तर प्रदेशातील अनेक तरुणांना योग्य मार्गावर परत आणण्यासाठी आता दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत अशा तरुणांची घरवापसी होणार आहे.

इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्यांच्या संशयावरून एटीएसने नुकतीच चार जणांना अटक केली होती. यावरून राज्यातील इसिसकडून प्रभावित होत असल्याचे स्पष्ट झाले होते. चिंता व्यक्त करत राज्य सरकारने एटीएसला यास आवर घालण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार एटीएसने हा उपक्रम हाती घेतला असून, त्याअंतर्गत अशा व्यक्ती व तरुणांचा शोध घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न होणार आहे.

इसिस समर्थक सोशल मीडियाद्वारे तरुणांशी संपर्क साधून त्यांची माथी भडकवण्याचे काम करीत आहेत. ही बाब एव्हाना लक्षात आली असून, या उपक्रमाअंतर्गत योग्य मार्गावर आलेल्या व्यक्ती व तरुण पुन्हा प्रभावित होतील, अशी शक्‍यता व्यक्त होत असल्याने त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

...तर एटीएसकडे संपर्क साधा
आपला मुलगा किंवा कुटुंबातील सदस्य दहशतवादाच्या वाटेवर जात असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले आणि त्याला रोखण्यात अपयश आले तर, त्यांनी निश्‍चिंत होऊन एटीएसशी संपर्क साधावा, असे आवाहन एटीएसने केले. पालक, मित्र, इतर व्यक्तींच्या सहकार्याने अशा तरुणांची किंवा व्यक्तींची मने वळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना शिक्षण आणि रोजगारासाठी सहकार्यही केले जाईल, असे एटीएसने म्हटले आहे.

Web Title: Uttar Pradesh ATS to run ‘Ghar Wapsi’ campaign for misguided youth