काश्‍मिरींविरोधात उत्तर प्रदेशात बॅनर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मीरत: काश्‍मिरी नागरिकांवर बहिष्कार टाकावा आणि या लोकांनी उत्तर प्रदेश सोडून निघून जावे, असे आवाहन करणारे बॅनर आज येथे काही ठिकाणी लागल्याचे आढळून आले. काश्‍मीरमध्ये सुरक्षा जवानांवर होत असलेल्या दगडफेकीचा निषेध म्हणून हे बॅनर लावण्यात आले होते.

मीरत: काश्‍मिरी नागरिकांवर बहिष्कार टाकावा आणि या लोकांनी उत्तर प्रदेश सोडून निघून जावे, असे आवाहन करणारे बॅनर आज येथे काही ठिकाणी लागल्याचे आढळून आले. काश्‍मीरमध्ये सुरक्षा जवानांवर होत असलेल्या दगडफेकीचा निषेध म्हणून हे बॅनर लावण्यात आले होते.

उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना या फार प्रसिद्ध नसलेल्या छोट्या संघटनेने हे बॅनर लावले होते. काश्‍मिरी विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयांबाहेर हे बॅनर लावल्याचे या संघटनेचे प्रमुख अमित जानी यांनी सांगितले. हे बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हे केवळ पहिले पाऊल असून, 30 एप्रिलनंतर उत्तर प्रदेश सोडून न जाणाऱ्या काश्‍मिरी नागरिकांवर "हल्लाबोल' केला जाईल, अशी आक्रमक भूमिका या संघटनेने घेतली आहे. अमित जानी यांच्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील मेवाड विद्यापीठातील काश्‍मिरी विद्यार्थ्यांनाही मारहाण झाली होती. ही मारहाण करणाऱ्या गुंडांना राजस्थान पोलिसांनी तातडीने अटकही केली होती. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी आज "काश्‍मिरी विद्यार्थी ही आमची मुले आहेत,' असे सांगत काश्‍मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना केल्याचे सांगितले.


काश्‍मिरी नागरिकांबरोबर गैरवर्तणूक झाल्याच्या काही घटना समजल्या आहेत. ही निषेधार्ह घटना आहे. काश्‍मिरी हे इतर भारतीयांपेक्षा वेगळे नाहीत. त्यामुळे काश्‍मिरींच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्या आहेत.
- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री


Web Title: Uttar Pradesh banner against Kashmiri