बरेलीत भीषण अपघात; रुग्णवाहिका-ट्रकच्या धडकेत सात जणांचा जागीच मृत्यू

Delhi-Lucknow National Highway Accident
Delhi-Lucknow National Highway Accidentesakal
Summary

दिल्ली-लखनौ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झालाय.

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात (Uttar Pradesh, Bareilly) आज एका रुग्णवाहिकेला (Ambulance) ट्रकनं धडक दिल्यानं सात जणांचा मृत्यू झालाय. पीडितांमध्ये पिलभीत येथील एका कुटुंबातील सहा सदस्यांचा समावेश आहे, जे तपासणीनंतर रुग्णवाहिकेतून दिल्लीला परतत होते, असं पोलिसांनी सांगितलंय.

दिल्ली-लखनौ राष्ट्रीय महामार्गावर (Delhi-Lucknow National Highway) पहाटे हा अपघात झालाय. रुग्णवाहिका प्रथम रस्ता दुभाजकाला धडकली आणि नंतर ट्रकला धडकली. परिणामी, चालक आणि वाहनातील इतर सहा जणांचा मृत्यू झाला, असं त्यांनी सांगितलं. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Delhi-Lucknow National Highway Accident
जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरात जोरदार चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सीएम योगी यांनी ट्विटव्दारे दु:ख व्यक्त केलंय. बरेली जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघाताबद्दल मला खूप दु:ख वाटतंय. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com