कॉपीमुक्त परीक्षेसाठी उत्तर प्रदेशात गुप्तचर विभागाची मदत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

परीक्षेत पोलिसांचे सर्वत्र लक्ष असेल आणि कॉपी पुरविण्याचे काम करणाऱ्यांना तुरुंगात पाठविले जाईल. सामूहिक कॉपीसाठी ओळखळ्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी "एसटीएफ' आणि स्थानिक गुप्तचर यंत्रणांची मदत घेण्यात येणार आहे

लखनौ - उत्तर प्रदेशमधील दहावी व बारावीच्या बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. त्यानुसार परीक्षा काळात विशेष कृती दल (एसटीएफ) आणि स्थानिक गुप्तचर यंत्रणांची मदत घेऊन यंदा "शिक्षण माफियां'वर नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री दिनेश शर्मा यांनी आज (शुक्रवार) दिली.

ते म्हणाले, ""परीक्षेत पोलिसांचे सर्वत्र लक्ष असेल आणि कॉपी पुरविण्याचे काम करणाऱ्यांना तुरुंगात पाठविले जाईल. सामूहिक कॉपीसाठी ओळखळ्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी "एसटीएफ' आणि स्थानिक गुप्तचर यंत्रणांची मदत घेण्यात येणार आहे. यंदा परीक्षा केंद्रांची संख्या कमी केली असून 12 हजारहून साडेआठ हजारपर्यंत आणली आहे. सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा आणि अन्य सुविधा केंद्रावर उपलब्ध आहेत का याची खात्री करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये दहावी व बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता.6) सुरू होणार आहे.

Web Title: uttar pradesh copy examination intelligence

टॅग्स