उत्तर प्रदेशात महिलेला जाळले

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

शवविच्छेदनाच्या अहवालानुसार पीडित महिलेचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शनिवारी राख गोळा करताना या महिलेचा मृतदेह सापडल्याने ही घटना उघडकीस आली, असे पोलिसांनी सांगितले

कानपूर - येथील गुलाली गावात लपून बसलेल्या एका महिलेला गुरुवारी "होलिका दहन' कार्यक्रमाच्या वेळी जाळून मारण्यात आल्याची घटना येथे शनिवारी उघडकीस आली, असे पोलिसांनी सांगितले. सीमा देवी असे या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर दोन दिवसांनी तिचा मृतदेह सापडला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, तीन डॉक्‍टरांचे पथक हे काम करीत आहे, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

शवविच्छेदनाच्या अहवालानुसार पीडित महिलेचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शनिवारी राख गोळा करताना या महिलेचा मृतदेह सापडल्याने ही घटना उघडकीस आली, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: uttar pradesh crime fire