UP School Close : उत्तर प्रदेशातल्या सहा जिल्ह्यांमध्ये शाळा बंद; प्रशासनाने का घेतला निर्णय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP School Close

UP School Close : उत्तर प्रदेशातल्या सहा जिल्ह्यांमध्ये शाळा बंद; प्रशासनाने का घेतला निर्णय?

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशमध्ये शाळा बंद करण्याचा तातडीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बरेली, अलिगड आणि पीलीभीतसह इतर जिल्ह्यांमध्ये 29 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या थंडीचा जोर वाढला आहे. थंडी एवढी वाढली आहे की, जिल्हाधिकाऱ्यांना शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. राज्यातील तब्बल सहा जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आदेशामध्ये आठवीपर्यंतच्या सगळ्या परिषदांच्या शाळा, खाजगी इंग्रजी शाळा, सीबीएसई, आयसीएसई, उत्तर प्रदेश बोर्डाच्या शाळा २८ डिसेंबरपर्यंत बंद असतील. २९ डिसेंबरला गुरुगोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त शाळांना सुट्टी असणार आहे.

आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत होणार आहेत. रुहेलखंड विद्यापीठ परिसरात आणि संबंधीत महाविद्यालयांमध्ये ३० डिसेंबर ते ७ जानेवारीदरम्यान सुटी देण्यात आलेली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच दिल्लीमध्ये थंडीमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे चीनमध्ये कोरोनाचा हाहाःकार झाल्याच्या बातम्या येत आहेत. भारत सरकार अलर्ट मोडवर आलेलं आहे. देशामध्ये कोरोनाविषय नियम पाळण्याचं आवानह करण्यात आलेलं आहे.

टॅग्स :Uttar PradeshCold